मुलगी असावी तर अशी... हुंड्याच्या ७५ लाखांचा घेतला कौतुकास्पद निर्णय

अंजलीच्या वडिलांनी तिला ब्लँक चेक दिला व तिच्या मर्जीनुसार रक्कम भरायला सांगितली.
मुलगी असावी तर अशी... हुंड्याच्या ७५ लाखांचा घेतला कौतुकास्पद निर्णय

जयपूर: राजस्थानमध्ये (Rajasthan) एक नववधुने आपल्या कृतीमधून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. तिचं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. अंजली कनवरने आपल्या कृतीमधून स्त्री शिक्षणाचं (Girls education) महत्त्व अधोरेखित केलं. मुलींना शिक्षणाच्या (Education) चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी अंजलीने तिच्या हुंड्यासाठी (Dowry) जमवलेल्या रक्कमेतून मुलीचे हॉस्टेल बांधण्याची कुटुंबीयांकडे विनंती केली.

किशोर सिंह कानोड यांची मुलगी असलेल्या अंजलीने २१ नोव्हेंबरला प्रवीण सिंह बरोबर लग्न केलं. लग्नाच्या आधी अंजली तिच्या वडिलांबरोबर बोलली. लग्नाला हुंडा देण्यासाठी म्हणून जमवलेली रक्कम मुलीचे वसतिगृह बांधण्यासाठी खर्च करावी, अशी तिने विनंती केली. किशोर सिंह यांनी लगेच मुलीची मागणी मान्य केली व मुलीच्या इच्छेनुसार, ७५ लाख रुपये हॉस्टेल बांधणीसाठी दिले. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

मुलगी असावी तर अशी... हुंड्याच्या ७५ लाखांचा घेतला कौतुकास्पद निर्णय
ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो: मुंबईला वाचवणाऱ्या NSG-मार्कोसची गोष्ट

अंजली कनवरच्या या कृतीचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर अंजलीने महंत प्रताप पुरी यांच्याशी बोलली व पत्रातून आपली इच्छा प्रगट केली. महंतांनी जमलेल्या पाहुण्यांसमोर ते पत्र वाचून दाखवलं. उपस्थितांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचं कौतुक केलं. अंजलीच्या वडिलांनी तिला ब्लँक चेक दिला व तिच्या मर्जीनुसार रक्कम भरायला सांगितली.

मुलगी असावी तर अशी... हुंड्याच्या ७५ लाखांचा घेतला कौतुकास्पद निर्णय
'२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की...' NCP चा राणेंवर प्रहार

तारातारा मठाचे प्रमुख असलेले महंत प्रताप पुरी यांनी या संकल्पनेचं कौतुक केलं. समाजाच्या कल्याणासाठी रक्कम बाजूला काढणं आणि कन्यादानाच्यावेळी स्त्री शिक्षणाबद्दल बोलणं ही प्रेरणादायी कृती आहे, असे महंत प्रताप पुरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com