ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो: मुंबईला वाचवणाऱ्या NSG-मार्कोस या दोन एलिट फोर्सबद्दल जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NSG

ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो: मुंबईला वाचवणाऱ्या NSG-मार्कोसची गोष्ट

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला (26/11 attack) आज १३ वर्ष पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्याच्या (Terror attack) आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. समुद्रमार्गे पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला होता. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला होता. अत्याधुनिक मशिन गन्स, ग्रेनेड्सनी सुसज्ज असलेल्या दहशतवाद्यांशी लढण्याचा मुंबई पोलिसांकडे अनुभव नव्हता. तरीही मुंबई पोलिसांनी आपल्यापरीने या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

NSG स्पेशल फोर्स

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे NSG कमांडोंना पाचारण करण्यात आलं. एनएसजी कमांडोजना 'ब्लॅक कॅट' कमांडोही म्हटलं जातं. NSG ही स्पेशल फोर्स आहे. सन १९८४ मध्ये एनएसजीची स्थापना करण्यात आली. अपहरण, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका या मध्ये एनएसजी कमांडो पारंगत असतात. भारतीय लष्कर, सीआरपीएफ, आयटीबीपी, आरएएफमधून एनएसजीसाठी निवड केली होती. एनएसजी कमांडो बनण्यासाठी ९० दिवसांच्या खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं.

कुठल्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कमांडोजना शारीरिक आणि मानसिक कणखरतेचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांशी सामना करताना कमांडोसमोर अनेक आव्हान होती. त्यांना जागेबद्दल फारशी माहिती नव्हती. ताज, ओबेरॉय ही खूप मोठी बहुमजली हॉटेल्स आहेत. अत्यंत कमी कालावधीत त्यांना दहशतवाद्यांशी दोन हात करायचे होते. हे एक चॅलेंज होतं.

हेही वाचा: नवरा कॉलेजमध्ये असताना सासऱ्याने बलात्कार केला, सूनेची पोलिसात तक्रार

२६/११ हल्ल्याच्यावेळी केलेल्या या ऑपरेशनला NSG ने 'ब्लॅक टॉरनॅडो' नाव दिलं होतं. घटनास्थळी ड्रॉप करण्याआधी तयारीसाठी फक्त ३० मिनिटं दिली होती. अजमल कसाब वगळता नऊ दहशतवाद्यांना एनएसजी कमांडोनी कंठस्नान घातलं. अखेर २८ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता ऑपरेशन 'ब्लॅक टॉरनॅडो' संपलं.

हेही वाचा: 26/11 Mumbai attack: 'रॉ' चीफ देणार होते राजीनामा

मार्कोस कमांडोज

मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हॉटेल ताज आणि ऑबेरायमध्ये सर्वप्रथम मार्कोस कमांडोजनी मोर्चा संभाळला होता. त्यांनीच या दहशतवाद्यांशी दोन हात केले. MARCOS ही नौदलाची स्पशेल कमांडो फोर्स आहे. सागरी युद्धात हे कमांडो पारंगत असतात. सन १९८७ मध्या मार्कोसची स्थापना झाली. समुद्र, हवा आणि जमीन अशा तिन्ही ठिकाणची ऑपरेशन्स पार पाडण्यात मार्कोस कमांडोज माहीर असतात. मार्कोससाठी भारतीय नौदलातून कमांडोजची निवड केली जाते. वयाच्या विशी-पंचविशीतील तरुण निवडले जातात. दहशतवादी हल्ला मोडून काढणं, अपहरण, समुद्री चाचे, घुसखोरांवर कारवाई अशा सगळ्या ऑपरेशन्समध्ये मार्कोस कमांडोज पारंगत असतात. अत्यंत खडतर प्रशिक्षणातून या कमांडोजना जावं लागतं.

loading image
go to top