महात्मा गांधींचा पुन्हा अपमान; भाजप नेते म्हणतात बोलण्याचा अधिकार नाही का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma-Gandhi

महात्मा गांधींचा पुन्हा अपमान; नेते म्हणतात बोलण्याचा अधिकार नाही का?

मध्य प्रदेश : धार्मिक कार्यक्रमात भागवत कथा वाचन करताना तरुण मुरारी बापूने महात्मा गांधी यांचा अपमान केला. महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) अपमान केल्याप्रकरणी नरसिंहपूर पोलिसांनी मंगळवारी तरुण मुरारी बापूवर गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच अटक केलेल्या कालीचरण महाराजांना (Kalicharan Maharaj) तरुण मुरारी बापू पाठिंबा देत होता. देशाची फाळणी करणारी व्यक्ती राष्ट्रपिता कसे असू शकतो? राष्ट्रपिता किंवा महात्मा होऊ शकत नाही. ते देशद्रोही होते, असं वक्तव्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तरुण मुरारी बापूने रविवारी धार्मिक कार्यक्रमात ही माहिती दिली.

नरसिंगपूर जिल्ह्यातील स्टेशनगंज पोलिस ठाण्यात मुरारी बापूविरुद्ध लोकांना भडकावणे आणि शांतता भंग करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे नेते रोहित पटेल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर तरुण मुरारीच्या अटकेसाठी रोहित पटेल यांनी एसपी विपुल श्रीवास्तव यांना निवेदनही दिले आहे, असे उपनिरीक्षक विजय सेन यांनी सांगितले.

हेही वाचा: आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

तरुण मुरारीने लोकांची दिशाभूल केली. यासाठी पोलिसांनी त्याला अटक करावी. तरुण मुरारीच्या बोलण्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. तरुण मुरारीने देशातील सर्वांत प्रतिष्ठित व्यक्तीचा अपमान (Mahatma Gandhi) केला आहे, असे पटेल यांचे म्हणणे आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. आयोजकांची माहिती गोळा करीत आहोत. तरुण मुरारीला पोलिस लवकरच अटक करेल, असे पोलिस कॅप्टन विपुल श्रीवास्तव म्हणाले.

बोलण्याचा अधिकार नाही का?

प्रशासनाने संतांप्रती मवाळ दृष्टिकोन स्वीकारावा. मात्र, संतांनीही योग्य शब्दांचा वापर करावा. संतांविरुद्ध पोलिसांचा असा वापर चुकीचा आहे. एकीकडे राहुल गांधी आणि इतर विरोधीनेते तुकडे-तुकडे टोळीचे समर्थन करतात. दुसरीकडे संत मनातील भावना व्यक्त करत असताना बोलण्याचा अधिकार नाही का? वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी मानके ही काँग्रेस नेत्यांची राजकीय शैली आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top