International Civil Aviation Day : ऑपरेशन गंगा ते कुवैत; एअर इंडियाने वेधलं होतं संपूर्ण जगाचं लक्ष

जगभरात ७ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन साजरा केला जातो. या निमित्ताने एअर इंडियाद्वारे चालवण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनबाबत जाणून घेऊया.
Air India
Air IndiaSakal

International Civil Aviation Day 2022: देशांतर्गत प्रवास असो की देशाबाहेर जायचे असेल, विमान प्रवास हा चांगला पर्याय ठरतो. विमानामुळे कोठेही सहज प्रवास करणे सोपे झाले आहे. जगभरात ७ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन (International Civil Aviation Day 2022) साजरा केला जातो. केवळ प्रवासच नाही तर रेस्क्यू ऑपरेशन्स दरम्यान देखील विमानसेवा महत्त्वाचा भाग ठरते. संकटाच्या काळात अनेकदा एअर इंडियाने इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवले आहे. International Civil Aviation Day च्या निमित्ताने एअर इंडियाच्या अशाच ५ रेस्क्यू ऑपरेशन्सविषयी जाणून घेऊया.

ऑपरेशन गंगा

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान त्या देशात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सरकारद्वारे ऑपरेशन गंगा राबवण्यात आले होते. युद्धादरम्यान युक्रेनची एअरस्पेस पूर्णपणे बंद होती. त्यामुळे हंगेरी, स्लोवाकिया, पोलंड आणि रोमानिया येथून लोकांना बाहेर काढण्यात आले. यावेळी हजारो लोकांना रेस्क्यू करण्यात आले.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

कुवैत एअरलिफ्ट

‘वंदे भारत मिशन’ हे सरकारचे दुसरे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन आहे. इराकचे सैन्य कुवैतमध्ये घुसल्यानंतर १९९० मध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. यादरम्यान जवळपास १,७५,००० लोकांना एअर इंडियाने कुवैतमधून बाहेर काढले होते. एअर इंडियाच्या या ऑपरेशनची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये देखील झाली आहे.

वंदे भारत मिशन

करोना व्हायरस महामारी दरम्यान परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले होते. या दरम्यान १८ लाखांपेक्षा अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. केवळ विमानानेच नाही तर नौदलाने जहाजांद्वारे देखील अनेक भारतीयांना परत घरी आणले. या मिशन दरम्यान विमानांनी जवळपास ३० हजार उड्डाणे घेतली.

Air India
Best Earbuds: जबरदस्त ऑफर, ४ हजारांचे इयरबड्स मिळतायत अवघ्या १२९९ रुपयात; पाहा डिटेल्स

ऑपरेशन होम कमिंग

वर्ष २०११ लीबियात गृहयुद्धाला सुरुवात झाली होती. यावेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन होम कमिंग’ सुरू करण्यात आले होते. यावेळी १५,४०० पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते.

ऑपरेशन राहत

वर्ष २०१५ मध्ये यमन सरकार आणि हुती बंडखोरांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली होती. यावेळी अनेक भारतीय यमनमध्ये अडकले होते. या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राहत चालवण्यात आले. सरकारने यमनमधून जवळपास ७ हजार लोकांना बाहेर काढले. यात भारतीयांसह परदेशी नागरिकांचाही समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com