इथं युद्ध नाही; अमन आहे! (व्हिडिओ)

इथं युद्ध नाही; अमन आहे! (व्हिडिओ)

कारगिल - "पृथ्वीवरील नंदनवनातील युद्धभूमी' ही ओळख पुसण्यासाठी रविवारी पहाटे अवघं कारगिल उभं राहिलं अन्‌ धावलं. इथं वेदना, संघर्ष नाही, तर अमन (शांती) आहे, असा संदेश त्यांनी यातून दिला. 

पुण्यातील सरहद संस्थेने जम्मू काश्‍मीर खोऱ्यातील कारगिलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले होते. महाराष्ट्र, गोवा, केरळ, ओडिशा, सिक्कीम, कर्नाटक, बिहार, हरयाना, जम्मू काश्‍मीर, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांतील 42 शहरांमधून तीनशे जण यात सहभागी झाले. याशिवाय कारगिल जिल्ह्याच्या विविध भागांतून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. 

कारगिल परिसरातील अकरा शाळांमधून विद्यार्थी मॅरेथॉनसाठी आले होते. पॅरा ट्रूपर ब्रिगेडचे 25 अधिकारी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आग्रा येथून आले होते. ते एकत्र 42 किलोमीटर धावले. यातील राम भगत आणि नसीब सिंग यांनी कारगिल युद्धात योगदान दिले आहे. 

कारगिलमधील सरकारी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. यात प्रामुख्याने प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. मॅरेथॉनसाठी अंतराचे सात टप्पे करण्यात आले होते. 

मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला झुल्फीकार अली म्हणाला, ""धावल्याने आपले सामर्थ्य वाढतेच; पण डोक्‍यातील नकारात्मक विचार दूर होतात. त्यामुळे आरोग्याबरोबर काश्‍मीरला देशाच्या अन्य राज्यांबरोबर स्नेह वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.'' 

नववीत शिकणारी अमिना म्हणाली, ""शाळेमधे मॅरेथानसंबंधी माहिती देण्यात आली होती. आम्ही पाच मैत्रिणींनी यात भाग घेतला. धावण्याचा आम्ही खूप आनंद घेतला.'' 

मॅरेथॉनमधील विजेते 
- 160 किमी : आनंदू सुकुमारन (केरळ) 
- 120 किमी : इशिता गर्ग (दिल्ली), गुलाम हैदर (कारगिल) 
- 60 किमी : जावेद अली (लडाख) 
- 42 किमी : संतोष यादव (पॅरा ट्रूप ब्रिगेड) 
- 21 किमी : नीलेश बोराडे (ठाणे), बेकी पेडी (शिलॉंग) 
- 10 किमी : सई अडवाडकर (पुणे), पंकज परदेशी (इंदूर) 

मॅरेथॉनमध्ये गेल्या वर्षी एक हजार 800 हून अधिक लोक सहभागी झाले होते. यंदा ही संख्या अडीच हजारांपर्यंत वाढली आहे. कारगिलमधील पर्यटन वाढून तरुणांसाठी रोजगार निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा हेतू आहे. 
- संजीव शहा, संयोजक, कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com