Video: खेळाडूच्या दोरीवरील आगळ्या वेगळ्या उड्या पाहाच

वृत्तसंस्था
Tuesday, 29 September 2020

अनेकजण दोरीवर उड्या मारत असतात. पण, एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने दोरीवर वेगळ्या पद्धतीने उड्या मारल्या असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. झोरावर सिंग असे खेळाडूचे नाव असून, त्यांची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

नवी दिल्लीः अनेकजण दोरीवर उड्या मारत असतात. पण, एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने दोरीवर वेगळ्या पद्धतीने उड्या मारल्या असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. झोरावर सिंग असे खेळाडूचे नाव असून, त्यांची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

Video: कुत्र्याच्या पिल्लाचे घरात अनोखे स्वागत!

झोरावर सिंग यांनी इन्स्टाग्रामवरून व्हिडिओ शेअर केला आहे. 6 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हे करणे शक्य झाले आहे. माझ्या मित्रांसोबत हा स्टंट केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करतानाच कौतुकही केले आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'चार जण एका दोरीवर स्टंट करताना दिसत असून, यामध्ये झोरावर सिंग हे सुद्दा आहेत. दोघांनी दुसऱ्या दोघांना खांद्यावर घेतले आहे. खांद्यांवर बसलेले दोन युवक उड्यांची मोठी दोरी फिरवत आहे आणि ते ज्यांच्या खांद्यांवर बसले आहेत ते युवक त्यांना घेऊन दोरीच्या उड्या मारत आहेत. नंतर खांद्यांवरचे दोघे खाली उतरतात. ते दोन दोऱ्या फिरवतात आणि त्यावर ते स्वत: आणि त्यांना खांद्यांवर घेतलेले युवकही उड्या मारतात. हात जमिनीवर टेकूनही उडी मारतात.'

दरम्यान, दोरीवरील उड्यांचा आगळा-वेगळा व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. टीमवर्क आणि परस्परांशी असलेला ताळमेळ पाहून विशेष वाटते. यापूर्वी झोरावर सिंग यांनी रोलर स्केट घालून दोरीवरच्या उड्या मारून विक्रम केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: international world record player zaravar singh skipping rope stunt video viral

Tags
टॉपिकस
Topic Tags: