काश्‍मीरमध्ये इंटरनेट अद्यापही बंदच

काश्‍मीरमध्ये इंटरनेट अद्यापही बंदच

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद असली तरी, परिस्थितीत सुधारणा झाली आहे. निवडक सरकारी कार्यालय आणि व्यवसाय प्रतिष्ठाने वगळता अन्यत्र ठिकाणी इंटरनेट बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रकारांकडून इंटरनेट सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली जात आहे. मात्र, इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याच्या कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पाच ऑगस्ट रोजी कलम 370 हटविल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काश्‍मीर खोऱ्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. आता बहुतांश भागातील निर्बंध हटवले असून, इंटरनेट सेवेवर मात्र बंदी कायम आहे. फुटीरवाद्यांना अद्याप नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, तर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केलेले आहे. काश्‍मीर खोऱ्यात परिस्थिती सामान्य राहण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी, दहशतवाद्यांकडून मात्र दुकानदारांना, व्यापाऱ्यांना धमक्‍या दिल्या जात आहेत.

लॅंडलाइन टेलिफोन सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. त्यानंतर पोस्टपेड मोबाइल सेवा बहाल केली गेली. मात्र, प्रीपेड मोबाईल आणि इंटरनेट सेवा मात्र अजूनही बंदच आहे. इंटरनेट सेवेचा दहशतवाद्यांकडून, फुटीरवाद्यांकडून तसेच शेजारील देशाकडून गैरफायदा उचलण्याची शक्‍यता गृहीत धरून बंदी कायम ठेवल्याचे प्रशासनाने सांगितले. काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थती संपूर्णपणे निवळल्यानंतर इंटरनेट पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com