यासिन मलिकच्या शिक्षेनंतर श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद, सुरक्षेत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

internet services suspended in srinagar ahead of yasin maliks sentence security beefed up in kashmir

यासिन मलिकच्या शिक्षेनंतर श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद, सुरक्षेत वाढ

यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावण्यापूर्वीच काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यासोबतच श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. यासीन मलिकला एनआयए कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच मलिकला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की, लाल चौकातील काही दुकानांसह मैसुमा आणि लगतच्या भागात बहुतांश दुकाने बंद राहिली. जुन्या शहरातील काही भागात दुकाने बंद राहिली, परंतु सार्वजनिक वाहतूक सामान्य राहिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: यासिन मलिक-मनमोहन सिंग यांचा फोटो व्हायरल, काय आहे त्या मागचं सत्य?

दिल्ली न्यायालयाने 19 मे रोजी बंदी घातलेल्या जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा प्रमुख यासिन मलिक याला UAPAअंतर्गत दोषी ठरवले होते. त्याने एनआयए अधिकाऱ्यांना मलिकच्या आर्थिक स्थितीचे आकलन करून त्याच्यावर दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा: हल्ल्यापूर्वी माथेफिरूचं एका मुलीशी चॅटिंग; म्हणाला, "माझ्याकडं एक..."

Web Title: Internet Services Suspended In Srinagar Ahead Of Yasin Maliks Sentence Security Beefed Up In Kashmir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jammu And Kashmir
go to top