
A visual chart showing the eight types of Interpol notices — from Red Corner (wanted criminals) to Blue Corner (information gathering) — used globally to coordinate international policing efforts.
esakal
Summary
ब्लू कॉर्नर नोटीस – गुन्हेगारांच्या हालचालींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते.
ग्रीन, पर्पल, ब्लॅक, ऑरेंज नोटीसा – वेगवेगळ्या गुन्हेगारी आणि सुरक्षेच्या धोक्यांसाठी जारी केल्या जातात.
इंटरपोल नोटीसा सदस्य देशांमधील पोलिस सहकार्य आणि गुन्हेगारीविरुद्ध आंतरराष्ट्रीय समन्वय वाढवतात.
Interpol Blue Notice Example : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला परदेशातून भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.इंटरपोलने घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर" नोटीस जारी केली आहे.पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्र व्यवहार करण्यात आल्यानंतर नोटीस जारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने इंटरपोलच्या नोटीसांबद्दल चर्चा सुरु झाली आहे. चला तर मग इंटरपोल किती प्रकारच्या नोटीस जारी करते? त्याचा सदस्य देशांना कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.