बलात्कारातील आरोपीला एसपींनी घातल्या गोळ्या

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जून 2019

नाजिलने त्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सिव्हील लाइन पोलिस मागील दीड महिन्यांपासून नाजिलच्या शोधात होते. या दरम्यान या चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांवर टीका केली जात होती. यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांनी नाजिलला शोधण्यासाठी काही पथके नियुक्त केली होती. आरोपीला पकडताना पोलिसांना एन्काउंटर करावे लागले.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्या खून केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीवर पोलिस अधीक्षक (एसपी) अजयपाल शर्मा यांनी चक्क गोळीबार करत त्याला जखमी केले. 

रामपूर येथे गेल्या महिन्यात 7 मे रोजी एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी नाजिल हा फरार होता. शनिवारी त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळ रचला. पण, यावेळी झालेल्या चकमकीत रामपूरच्या पोलिस अधीक्षकांनी आरोपीच्या दोन्ही पायावर गोळ्या घालत त्याला अटक केली. आरोपीला गोळ्या घालत पकडल्यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान यानंतर जखमी आरोपी नाजिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नाजिलने त्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सिव्हील लाइन पोलिस मागील दीड महिन्यांपासून नाजिलच्या शोधात होते. या दरम्यान या चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांवर टीका केली जात होती. यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांनी नाजिलला शोधण्यासाठी काही पथके नियुक्त केली होती. आरोपीला पकडताना पोलिसांना एन्काउंटर करावे लागले. पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी ट्रेस केले. मात्र यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये चांगलीच धरपकड झाली. यावेळी एसपी अजय पाल शर्मा यांनी नाजिलच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर गोळ्या झाडल्या आणि त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीवर गोळ्या झाडत त्याला पडकणारे एसपी अजय पाल यांच्यावर स्थानिक लोकांसह देशभरातून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPS Ajay Pal Sharma shoots Nazil, accused of abducting, raping and killing a 6-year-old girl