विमानतळावर IPS अधिकाऱ्याची तपासणी; बॅगभरून सापडल्या वाटाण्याच्या शेंगा

Green Peas
Green Peas
Summary

आयपीएस अधिकाऱ्याच्या बॅगची तपासणी करताना त्यात वाटाण्याच्या शेंगा सापडल्या असून याचा फोटोही अधिकाऱ्याने शेअर केलाय.

विमानतळावर प्रत्येक प्रवाशांच्या बॅगची तपासणी होते. त्यात ड्रग्ज किंवा इतर गोष्टी ज्यांची वाहतूक विमानातून करण्यास बंदी असेल तर त्या प्रवाशावर कारवाई केली जाते किंवा त्याची चौकशी होते. एखादी वस्तू परदेशातून आणली असल्यास त्या वस्तुची कस्टम ड्युटी भरली नसेल तर संबंधितांवर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा प्रश्न पडावा असा वस्तूही सापडतात. जयपूर विमानतळावर आयपीएस अरुण बोथरा यांची बॅग तपासण्यात आली. त्यात जे सापडलं त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.

आयपीएस बोथरा यांना जयपूर विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी त्यांची बॅग उघडण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये हिरव्या वाटाण्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणावर आढळल्या. त्यांनी याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला असून त्याचे मीम्स व्हायरल होत आहेत.

आयपीएस अरुण बोथरा हे परिवहन आयुक्त म्हणून ओडिसात कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांची बॅग उघडलेली दिसत असून हिरव्या वाटण्याच्या शेंगांनी ती भरलेली दिसते. जेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या बॅगेत हिरव्या वाटाण्याच्या शेंगा पाहिल्या तेव्हा त्यांनाही धक्का बसला. अरुण बोथरा यांनी सांगितले की, या शेंगा त्यांना ४० रुपये किलो इतक्या दराने खरेदी केल्या होत्या.

Green Peas
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'मलाही पेगाससची ऑफर, पण मी नाकारली; कारण..'

अरुण बोथरा यांच्या ट्विटरवरचा हा फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्या ट्विटवरून आयएएस अवनिश शरण यांनीही एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मी एकदा घरी जात असताना दुधी भोपळा आणि वांगी नेत होतो, त्यासाठी विमानतळावर २ हजार रुपये द्यावे लागले होते. आयएफस प्रवीण कासमान यांनी बोथरा यांची फिरकी घेताना म्हटलं की, मटर स्मगलिंग सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com