IPS अधिकाऱ्याच्या अफेअर्समुळे पत्नी परेशान; थेट अमित शहांनाच लिहिलं पत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

उत्तर प्रदेश कॅडरच्या २००९ च्या बॅचच्या एका आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने (IPS Officer) गंभीर आरोप लावले आहेत.

लखनऊ- उत्तर प्रदेश कॅडरच्या २००९ च्या बॅचच्या एका आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने (IPS Officer) गंभीर आरोप लावले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नीने लावला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. आयपीएस अधिकारी सध्या केंद्रीय प्रतीनियुक्तीवर आहे.

आयपीएस अधिकाऱ्यावर अनैतिक संबंध असल्याचा आरोप

आयपीएस अधिकाऱ्याचे २०१४ मध्ये लग्न झाल्याचं सांगण्यात येतंय. अधिकाऱ्याची पत्नीही केंद्रीय प्रशासकीय सेवेत अधिकारी आहे. पत्रानुसार आयपीएस अधिकाऱ्याने आपली चूक कबुल केली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक अधिकाऱ्यांवर यापूर्वीही असे आरोप लावण्यात आले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने अमित शहा यांना पत्र लिहून त्या महिला आणि मुलींशी संबंधित संभाषण, प्रवासाचे डिटेल्स असे काही पुरावे पाठवले आहेत. 

देशाच्या जीडीपीत ऐतिहासिक घट; इतर प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती...

पत्नीने केलेल्या तक्रारीमध्ये आयपीएस अधिकाऱ्याचे मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या एका जिल्ह्यातील १८ वर्षीय मुलीबरोबर संबंध असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मुलगी आपल्या वडिलांच्या एका केस प्रकरणी एसपी ऑफीसमध्ये आली होती. हळूहळू या दोघांतील संबंध वाढत गेले आणि अधिकाऱ्याच्या दुसऱ्या जिल्ह्यातील बदलीनंतरही या अधिकाऱ्याने मुलीशी भेटगाठ सुरुच ठेवली.

सहकारी अधिकाऱ्याच्या पत्तीसोबतही संबंध असल्याचा आरोप

अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. माझ्या पतीचे सहकारी अधिकाऱ्याच्या पत्तीसोबतही अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. यूपी कॅडरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीशी संबंध असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. जेव्हा या अधिकाऱ्याला या संबंधाची माहिती झाली तेव्हा त्याने पत्नीशी तलाक घेऊन तक्रार दाखल केली आहे.

निगेटिव्ह जीडीपी रेट'चा सांगावा 

२०१८ मध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी आयपीएस अधिकाऱ्याने पुन्हा अशी चूक न करण्याचं मान्य केलं होतं. मात्र, काही दिवसांनी पुन्हा अधिकाऱ्याचे लक्ष हटले. त्याने उज्जैनमधील एका मुलीसोबत संबंध प्रस्थापित केले. आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने अधिकाऱ्याला एका चंदीगडच्या मुलीसोबतही पकडलं होतं.

पत्नीने सांगितल्यानुसार, ८ ऑगस्टला त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला. आयपीएस अधिकाऱ्याच्या संबंधात आलेल्या एका तरुणीने त्यांना मेसेज केला होता. अधिकाऱ्यासोबत ६ महिने लिव इनमध्ये राहिल्याची कबुली या मुलीने दिली आहे. अधिकाऱ्याने या मुलीला त्याचे लग्न झाल्याची माहिती दिली नव्हती. तरुणीने अधिकाऱ्यासोबतचे संभाषण आणि चॅटचा पुरावा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPS officer wife letter to Amit Shah for Many immoral relationships of her husband