

IPS Officers Fight
Esakal
दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पार्टीदरम्यान जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. आसाममध्ये घडलेल्या हाणामारीच्या या घटनेत कोकराझारचे पोलीस अधीक्षक (SSP) अक्षत गर्ग जखमी झाले आहेत. तर दुसरे अधिकारी DIG वायटी ग्यात्सो यांच्याशी त्यांचा वाद झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांमधील वाद सोडवण्यासाठी हाचलाली केल्या जात आहेत. दरम्यान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.