आता पाठपुरावा नव्या मशिदीसाठी - इक्बाल अन्सारी (व्हिडिओ)

मंगेश कोळपकर
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

‘ते’ का नाही आले या लढ्यात?
ओवेसी यांच्यासह अनेकांनी न्यायालयाने दिलेल्या निकलाबद्दल आक्षेप घेतला आहे. त्याबद्दल विचारल्यावर अन्सारी म्हणाले, ‘‘आम्ही इतकी वर्षे कोर्टात लढत आहोत, तेव्हा ते कधी आले नाहीत. आता काय करणार?

अयोध्या - रामजन्मभूमीच्या कथित जागेवर पुन्हा मशीद उभारावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार नाही, असे इक्बाल अन्सारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना आज स्पष्ट केले.

रामजन्मभूमी न्यासाच्या विरोधात गेली ७० वर्षे अन्सारी कुटुंबीय न्यायालयीन संघर्ष करीत आहेत. रामजन्मभूमी न्यास आणि काही हिंदू संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर प्रतिवादी म्हणून इक्बाल यांचे वडील हाशिम अन्सारी यांनी याचिका दाखल केली होती. हाशिम यांचा मृत्यू झाल्यावर इक्बाल गेल्या ३० वर्षांपासून या खटल्यात प्रतिवादी आहेत. 

त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘आमच्या दाव्यात तथ्य होते म्हणूनच ७० वर्षे हा खटला चालला. त्यातच सगळे काही आले. मशिदीमध्ये मूर्ती नेवून ठेवल्या म्हणून ते मंदिर होत नाही, हा आमचा पुराव्यासह केलेला दावा कोर्टाने मान्य केला नाही.’’ निकलाबद्दल आम्ही काही टिप्पणी करणार नाही. पण, आमची उमेद कायम आहे आणि त्यावरच आमचा विश्वास कायम आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले. 

कोर्टाचा निकाल आम्हाला मान्य आहे. आता ५ एकर जागा आम्हाला लवकर मिळावी म्हणजे आमचीही मशीद लवकर उभारता येईल, असे अन्सारी यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iqbal Ansari Talking on new masjid in Ayodhaya