Iran–Israel War Impact on India LPG Supply
esakal
इराण-इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता इतर देशांवरही दिसू लागला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये तेल आणि गॅसच्या पुरवठ्याबाबत संकट निर्माण झाले आहे. सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम दिसू लागला आहे. अनेक शहरांमध्ये गॅससाठी लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.