गोवा ट्रिप फक्त 400 रुपयात !

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकजण फेव्हरिट डेस्टिनेशन असलेल्या गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असतात. तर, काहीजणांना मात्र या काळात प्रवास आणि राहण्याचा खर्च जास्त असल्याने गोवा फिरायला जाणे शक्य होत नाही. मात्र, आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे गोवा फक्त 400 रुपयात फिरणे शक्य होणार आहे. 

'हॉप ऑन हॉप ऑफ गोवा बाय बस' या योजनेअंतर्गत गोवा फिरण्यासाठीचे दोन पर्याय दिले गेले आहेत. यामध्ये जे टुरिस्ट फक्त साऊथ गोवा पाहू इच्छितात त्यांना फक्त 400 रुपयांचे प्रवास भाडे असणार आहे. तर, नॉर्थ आणि साऊथ गोवा पाहणाऱ्यांना फक्त 600 रुपये प्रतिव्यक्ती इतक्या माफक दरात गोवा ट्रिप एन्जॉय करता येणार आहे. 

या पॅकेज अंतर्गत नॉर्थ गोवा ट्रिप मध्ये सेंट्रल गोवा, गोवा सायन्स म्यूजियम, कला अकॅडेमि, भगवान महावीर गार्डन सारख्या ठिकाणांचा समावेश आहे. तर, साऊथ गोवा अंतर्गत गोवा फोर्ट, सिंकेरिम बीच/फोर्ट, सेंट ऐंटनी चैपल, सेंट ऐलेक्स चर्च यांसारख्या लोकप्रिय स्थळांचा समावेश आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन बुकिंग करता येऊ शकते. 

Web Title: IRCTC is offering Goa tour at just Rs 400

टॅग्स