इरोम शर्मिलांनि अखेर उपोषण सोडले

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

इम्फाळ- मणिपूरमधील आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरोम शर्मिला यांनी आज (मंगळवार) उपोषण सोडले. सैन्याच्या विशेषाधिकाराच्या विरोधात मागील सोळा वर्षांपासून सुरू असलेले उपोषण त्यांनी आज अंतिमतः मागे घेतले.

सैन्याच्या विशेषाधिकाराच्या विरोधात इरोम शर्मिला यांनी उपोषणाच्या माध्यमातून संघर्ष सुरू केला होता. मात्र आता उपोषण मागे घेऊन निवडणूक लढवून सत्तेचा भाग बनून हा कायदा तयार करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शर्मिला या आता विवाहबद्धही होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आपल्याला आता सामान्य आयुष्य जगण्याची इच्छा असल्याची भावना त्यांनी नुकतीच व्यक्त केली होती.

मालोम येथे 2000 मध्ये आसाम रायफल्सने केलेल्या गोळीबारात दोन लहान मुलांसह दहा नागरिक मृत्युमुखी पडले होते. नियोजनपूर्वक हा गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करीत शर्मिला यांनी 5 नोव्हेंबर 2000 रोजी हे उपोषण सुरू केले होते. त्यांनी 9 ऑगस्ट रोजी आपण हे उपोषण संपविणार असल्याचे 26 जुलै रोजी जाहीर केले होते. 

Web Title: Irom sarmila left end hunger strike

टॅग्स