खराब हवामानामुळे विमान हवेतच, 2 वेळा लँडिंगचा प्रयत्न झाला अयशस्वी; 2 मिनिटाचंच इंधन शिल्लक होतं अन्...

शनिवारी (१३ एप्रिल) आयोध्येवरुन दिल्लीला निघालेलं इंडिगो विमान एका मोठ्या अपघातातून वाचले आहे. खराब वातावरणामुळे इंडिगो विमान दिल्ली विमानतळावर उतरले नाही, परंतु धक्कादायक बाब ही आहे की विमानात फक्त दोन मिनिटांचे इंधन शिल्लक राहिले होते. ही संपूर्ण घटना विमानातून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने सोशल मिडीयावर पोस्ट करत सांगितली आहे.
indigo flight
indigo flightsakal

शनिवारी (१३ एप्रिल) आयोध्येवरुन दिल्लीला निघालेलं इंडिगो विमान एका मोठ्या अपघातातून वाचले आहे. खराब वातावरणामुळे इंडिगो विमान दिल्ली विमानतळावर उतरले नाही, परंतु धक्कादायक बाब ही आहे की विमानात फक्त दोन मिनिटांचे इंधन शिल्लक राहिले होते. ही संपूर्ण घटना विमानातून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने सोशल मिडीयावर पोस्ट करत सांगितली आहे.

प्रवासी शक्ती लुंबा यांनी म्हंटल आहे की, "विमानाला दोन वेळा दिल्ली विमानतळावर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो यशस्वी झाला. त्यानंतर विमानाला चंदीगडच्या दिशेने वळवण्यात आले." अशातच इंडिगोवर एसओपीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे.

इंडिगो विमानातून प्रवास करत असलेले पोलिस उपायुक्त सतीश कूमार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत सांगितले की, "इंडिगोचे हे विमान १३ एप्रिलला दूपारी ३ वाजून २५ मिनीटांनी आयोध्यातून निघणार होते आणि संध्याकाळी ४.३० मिनिटांनी दिल्लीला पोहचणार होते. विमान उतरण्याच्या १५ मिनीट अगोदर पायलेटने सांगितले कि, दिल्लीमध्ये खराब वातावरण असल्यामुळे विमान तेथे उतरवले जाणार नाही. काही वेळ विमान आकाशातच चकरा मारु लागले. विमानाने दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु तो यशस्वी झाला नाही."

कूमार यांनी पुढे सांगितले की, "पायलटने संध्याकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास सांगितले की, विमानात ४५ मिनीटे पुरेल इतकेच इंधन शिल्लक आहे. यावेळी दोन वेळा विमान लँड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ५.३० मिनीटांनी पायलटने सांगितले की, ते विमान चंदीगडच्या दिशेने वळवत आहेत. यावेळी काही प्रवाशांची तब्येत बिघडल्याचे निदर्शनास आले."

"इंडिगोमध्ये ४५ मिनीटांचे इंधन उरले आहे. या पायलटच्या विधानाच्या ११५ मिनीटांनंतर संध्याकाळी ६ वाजून १० मिनीटांनी विमान चंदीगड विमानतळावर लँड केले गेले. विमान उतरल्यानंतर क्रूमधील काही व्यक्तिंनी आम्हाला सांगितले की, आम्ही शेवटच्या क्षणाला विमान लँड केले आहे. विमानात एक ते दोन मिनीटांचे इंधन शिल्लक राहिले होती. हा खुप मोठा बेजबाबदारपणा आहे. तसेच विमानाने सुरक्षा नियमांचे उल्लंघन सुद्धा केले असल्याचा आरोप सतिश कूमार यांनी केला आहे.

इंडिगोने दिलेली प्रतिक्रिया

याबाबत स्पष्टीकरण देताना इंडिगोने सांगितले की, "१३ एप्रिलला आयोध्येवरुन दिल्लीला जाणाऱ्या विमानाला दिल्लीतील खराब वातावरणामुळे चंदीगडच्या दिशेने वळवण्यात आले. विमानाच्या पायलटनी एसओपीच्या अंतर्गतच काम केले. ही खुप सुरक्षित प्रक्रिया आहे. विमानाला इतर सुरक्षित विमानतळावर घेवून जाण्यासाठी विमानात इंधन होते. आमच्या प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. काही असुविधा झाली असेल तर मी खेद व्यक्त करतो."

indigo flight
Nashik Air Service : इंदूरसाठी विमानसेवेला उद्यापासून सुरवात; आठवड्यातून 3 दिवस विमान सेवा राहणार उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com