
मशिदीमध्ये 'जय श्रीराम'चा जयघोष करणे गुन्हा ठरणार नाही, या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. 'मशिदीत जय श्री रामचा जयघोष करणे गुन्हा कसा?' असा सवाल सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने केला याचिकाकर्त्याला केला. या प्रकरणी कर्नाटक सरकारला नोटीस बजावण्यास नकार देत कर्नाटक सरकारच्या याचिकेची प्रत सादर करण्याचे आदेशही दिले.