Akhilesh Yadav : आयोग दबावाखाली काम करतोय का? अखिलेश यादव

विकासकामांची उद्‍घाटने हा भाजपचा दिखाऊपणा
Akhilesh Yadav
Akhilesh Yadavesakal

लखनौ : निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का, असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी आज उपस्थित केला. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी काल राजीनामा दिला. त्यापार्श्‍वभूमीवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले, ‘‘लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना निवडणूक आयुक्तांनी राजीनामा देणे आश्‍चर्यकारक आहे. दबावामुळे अधिकाऱ्यांनी आपली पदे सोडण्याच्या घटना भाजपच्या कार्यकाळात अनेकदा झाल्या आहेत. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे, हा प्रश्‍न गोयल यांच्या राजीनाम्यामुळे उपस्थित झाला आहे.’

Akhilesh Yadav
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

गोयल यांची मुदत पाच डिसेंबर २०२७पर्यंत होती, तरी त्यांनी शनिवारी (ता. ९) राजीनामा दिला. मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेशातील विविध विकासकामांचे आज उद्‍घाटन करण्यात आले. त्यावर टीका करताना अखिलेश म्हणाले, ‘‘हा सगळा दिखाऊपणा आहे. निवडणूक जवळ आली असल्याने आपण काम केले आहे, हे भाजपला दाखवावे लागत आहे. त्यामुळे इतरांनी केलेली कामेही ते आपली म्हणून दाखवत आहेत.’’

Akhilesh Yadav
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

‘‘आझमगडमधील विमानतळ नेताजींनी (मुलायमसिंह यादव यांनी) बांधले, त्याचे आज उद्‍घाटन करण्यात आले. मोरादाबाद विमानतळही समाजवादी पक्षाने बांधले आहे. त्याचेही आता उद्‍घाटन होत आहे. या सरकारने केलेल्या कोणत्या कामाचे उद्‍घाटन ते करणार आहेत का?,’’ असे प्रश्‍नही अखिलेश यांनी उपस्थित केला. ‘‘हे ‘डबल इंजिन’चे सरकार आहे. पण त्यांनी विमानतळ बांधले नाहीत. जिथे विमानतळ आहेत, तेथे विमाने उतरत नाहीत. रसुलाबाद येथे धावपट्टी बांधण्यात आली. आता धावपट्टीवर सगळीकडे झाडे उगवली आहेत,’’ असे ते म्हणाले.

जनता धडा शिकवेल

‘‘यावेळी शिक्षक आणि बेरोजगार युवक भाजपचे सरकार उलथवून टाकतील,’’ असा दावा करून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. काँग्रेसबरोबरील बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीत भाजपच्या विरुद्धची रणनीती ठरविण्यासाठी ती बैठक झाली. ‘संविधान रक्षक’ एका बाजूला आणि ‘संविधान भक्षक’ दुसऱ्या बाजूला अशी यावेळची निवडणूक असेल. ‘इंडिया’ आघाडीतील तृणमूल काँग्रेसने पश्‍चिम बंगालमधील सर्व जागांवर उमेदवार जाहीर केल्याबद्दल विचारले असता, बोलण्यास अखिलेश यांनी नकार दिला. तसेच उत्तर प्रदेशातील उर्वरित जागांवरील उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com