केरळ-कर्नाटकमध्ये ISIS चे दहशतवादी; 'अल कायदा'चा हल्ल्याचा कट!

कार्तिक पुजारी
Saturday, 25 July 2020

दहशतवादावर संयुक्त राष्ट्राने एक अहवाल जारी केला असून भारताला सावध राहण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली- दहशतवादावर संयुक्त राष्ट्राने एक अहवाल जारी केला असून भारताला सावध राहण्यास सांगितले आहे. केरळ कर्नाटकमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांची मोठी संख्या असू शकते असं यूएनने म्हटलं आहे. शिवाय भारतीय उपमहाद्विपात अल-कायदाचे दहशतवादी संघटन हल्ला करण्याची योजना आखत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

चीनच्या अडचणी वाढल्या; अणू केंद्रातील ९० वैज्ञानिकांनी दिला राजीनामा
भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये १५० ते २०० दहशतवादी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयएसआयएस, अल कायदा आणि संबंधित  व्यक्ती अफगानिस्तानच्या निमरुज, हेलमंद आणि कंधार प्रांतातून भारतीय उपमहाद्विपात काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच दहशतवादी भारतात हल्ला करण्याचा कट रचत असल्याचं यूएनच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

यूएनच्या अहवालात असं म्हणण्यात आलं आहे की, बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये जवळजवळ २०० आयएसआयएस दहशतवादी आहेत. अल कायदाच्या सध्याचा प्रमुख ओसामा महसूद याचे नेतृत्व करत आहे. आसिम उमर मारला गेल्यानंतर त्याची जागा ओसामाने घेतली आहे.

अल कायदा आपल्या माजी प्रमुखाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतीय उपमहाद्विपात हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती आहे. अहवालानुसार, एका सदस्य राष्ट्राने माहिती दिली आहे की १० मे २०१९ रोजी घोषीत झालेल्या आयएसआयएसचा भारतीय सहयोगी 'हिंद विलायाह'चे १८० ते २०० सदस्य आहेत. केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये आयएसआयएसच्या सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत.

लष्कराच्या कारवाईला मोठं यश! श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा
मागील वर्षी इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेने भारतात एक नवी शाखा स्थापन केल्याचा दावा केला होता. काश्मिरमधील दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीनंतर याप्रकारची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली होती. आयएसआयएस दहशतवादी संघटनेने आपली वृत्त एजेंसी अमाकच्या माध्यमातून भारतातील नव्या शाखेचे अरबी नाव 'विलायाह ऑफ हिंद' (भारत प्रांत) असल्याचं म्हटलं होतं. जम्मू काश्मीरच्या एखा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या दाव्याचे खंडन केले होते. 

आयएसआयएस दहशतवादी संघटनेला कथित खुरासान प्रांतीय शाखेसोबत सोडले जाते. या शाखेची स्थापना २०१५ मध्ये झाली होती आणि याचे लक्ष्य अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि जवळचे क्षेत्र होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISIS terrorists in Kerala-Karnataka  said un