'चांद्रयान-2' प्रक्षेपण आता 22 जुलैला; इस्त्रोकडून माहिती

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

फ्युएल कंडक्‍टरमध्ये बिघाड झाल्याने इस्रो हे प्रक्षेपण थांबविले होते. त्यानंतर त्यांनी लवकरच नवी तारिख जाहीर करू असे म्हटले होते. अखेर आज तीनच दिवसांनी इस्त्रोने नवी तारिख जाहीर करताना 22 जुलैला प्रक्षेपण होणार असल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' या अवकाश यानाचे उड्डाण 15 जुलैला नियोजित वेळेच्या 56 मिनिटे आधी स्थगित केल्यानंतर आज (गुरुवार) भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) नवी तारिख जाहीर करण्यात आली आहे. आता चांद्रयान 2 चे प्रक्षेपण 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी होणार आहे.

फ्युएल कंडक्‍टरमध्ये बिघाड झाल्याने इस्रो हे प्रक्षेपण थांबविले होते. त्यानंतर त्यांनी लवकरच नवी तारिख जाहीर करू असे म्हटले होते. अखेर आज तीनच दिवसांनी इस्त्रोने नवी तारिख जाहीर करताना 22 जुलैला प्रक्षेपण होणार असल्याचे म्हटले आहे. 

आंध्र प्रदेशमधील श्रहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण होणार आहे. 'बाहुबली' म्हणजेच "जीएसएलव्ही एमके-3' या प्रक्षेपकाद्वारे चांद्रयान-2 अवकाशात झेप घेणार आहे. 15 जुलैला इंजिनमध्ये क्रायोजनिक इंधन भरताना तांत्रिक अडचण आल्याने 56 मिनिटे 24 सेकंद बाकी असताना 1 वाजून 55 मिनिटांनी प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय मोहीम नियंत्रण केंद्राने घेतला होता 'चांद्रयान-2'च्या प्रक्षेपणासाठी "इस्रो'ने गेल्या आठवड्यात रंगीत तालीम घेतली होती.

तीन वेळा तारीख पुढे ढकलली 
'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण या पूर्वीही तीन वेळा पुढे ढकलण्यात आले होते. सर्वांत प्रथम ऑक्‍टोबर 2018 मध्ये "चांद्रयान-2' आकाशात उड्डाण करणार होते. नंतर ही तारीख बदलण्यात येऊन 3 जानेवारी व पुन्हा 31 जानेवारी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, काही कारणाने 15 जुलैपर्यंत ही तारीख पुढे ढकलण्यात आली.

सर्वांत कमी खर्चातील मोहीम (आकडे कोटी रुपयांत) 
978 कोटी 
चांद्रयान -2 (भारत) 

1200 
चॅंग ई-4 (चीन) 

1400 
बेअरशिट (इस्राईल) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO announces Chandrayaan 2 launch date is 22 july