पायांत घालण्यासाठी नव्हती चप्पल; इस्रोच्या अध्यक्षांचा थक्क करणारा प्रवास

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकऱ्याचे पुत्र असलेले सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. तसेच चांद्रयान-2 या मोहिमेचंही तेच नेतृत्व करत आहेत. पण त्यांना कधीकाळी पायात घालण्यासाठी साधी चप्पलही नसायची. त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे.

थिरुअनंतपूरमः  इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या कैलाशवडीवू सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे. सिवन यांनी एका सरकारी शाळेतून तमीळ माध्यमातून शिक्षण घेतलं आहे. नागरकोयलच्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे गिरवले. सिवन यांनी 1980मध्ये मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी)मधून एयरोनॉटिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंसिज (आयआयएससी)तून इंजिनीअरिंगच्या पुढच्या शिक्षणाचे धडे गिरवले.

तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकऱ्याचे पुत्र असलेले सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. तसेच चांद्रयान-2 या मोहिमेचंही तेच नेतृत्व करत आहेत. पण त्यांना कधीकाळी पायात घालण्यासाठी साधी चप्पलही नसायची. त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे.

2006मध्ये आयआयटी बॉम्बेतून इंजिनीअरिंगमध्ये पीएचडीची त्यांनी पदवी मिळवली. सिवन पीएचडी मिळवणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांची बहीण आणि भाऊ गरिबीच्या कारणास्तव उच्च शिक्षण पूर्ण करू शकलेले नाहीत. जेव्हा ते कॉलेजमध्ये होते, तेव्हा शेतात वडिलांना मदत करायचे. त्यामुळेच वडिलांनी त्यांचं नाव घराजवळच्याच कॉलेजमध्ये घातलं. 

तसेच शिवन यांनी बीएससीला गणितात 100 गुण मिळवले, त्यावेळी शिवन यांचे मन बदलले. त्यांनी एमआयटीला प्रवेश घेतला. सिवन 1982मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्येक रॉकेट कार्यक्रमावर काम केलं. जानेवारी 2018मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं. शिवन यांनी 15 फेब्रुवारी 2017ला भारताकडून 104 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हा इस्रोचा विश्व रेकॉर्डही आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: isro chief k sivans Inspiring Story