2023 अखेरपर्यंत भारताच्या अंतराळवीराची अवकाश वारी | Gaganyaan

2023 अखेरपर्यंत भारताच्या अंतराळवीराची अवकाश वारी | Gaganyaan

इसरोची ( ISRO ) महत्वकांक्षी समानवी ‘गगनयान’ मोहिम ( Gaganyaan Mission ) 2021 मध्येच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यसभेत विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह (jitendra singh) यांनी इसरोच्या मोहिमांची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे

मानवी रोबोटही पाठवणार

भारताच्या संभाव्य अंतराळवीरांचे रशियामधील प्रशिक्षण, तसंच भारतातील मोहिमेसंदर्भातील तांत्रिक तयारी जोराने सुरु असल्याचं जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. २०२३ मध्ये ही मोहिम होणार असून त्याआधी गगनयानची तयारी सिद्ध करणाऱ्या दोन मोहिमा होणार आहेत, त्यापैकी एका मोहिमेत एक मानवी रोबोटही पाठवला जाणार आहे.

देशाच्या नागरीकाला अवकाशात पाठवणार

भारत स्बबळावर देशाच्या नागरिकाला अवकाशात पाठवणार आहे. देशाच्या अंतराळवीरांना vyomanauts – व्योमनॉट्स असंही संबोधलं जाणार आहे. या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आलं असून मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले GSLV Mk3 हे प्रक्षेपक – रॉकेट सज्ज आहे. तर अंतराळवीर ज्या यानातून प्रवास करणार आहेत ते यान – Crew Module च्या प्रत्यक्ष चाचण्या लवकरच सुरु होणार आहेत. अवकाशात जाणाऱ्या संभाव्य अंतराळवीरांचे प्रशिक्षण हे रशियात अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. २०२३ वर्षात सुरुवातीला गगनयानच्या दोन प्राथमिक मोहिमा होतील ज्यामध्ये अंतराळवीराचा सहभाग नसेल तर इस्त्रोनेच तयार केलेला मावनी रोबोट अवकाश वारी करतील. तेव्हा सर्व काही सुरळीत पार पडलं तर २०२३ च्या अखेरीस भारतीय अंतराळवीर हा प्रत्यक्ष अवकाशात पोहचलेला असेल. .

2023 अखेरपर्यंत भारताच्या अंतराळवीराची अवकाश वारी | Gaganyaan
पंतप्रधानांनी बिपीन रावत यांच्यासह 12 जणांच्या पार्थिवाला वाहिली श्रद्धांजली

रशियाकडून आवश्यक स्पेस सूट

भारतातील ५०० पेक्षा जास्त लहान, मोठ्या उद्योगांचा या मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागलेला आहे. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक स्पेस सूट हे रशियाकडून दिलं जाणार आहे. आत्तापर्यंत भारतासह विविध देशाच्या अंतराळवीरांनी अवकाश वारी केलेली आहे. असं असलं तरी फक्त रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या – प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तित जाण्याचा प्रयत्न करणार आहे.

2023 अखेरपर्यंत भारताच्या अंतराळवीराची अवकाश वारी | Gaganyaan
Omicron : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com