Isro Satellite Launch: चर्चा तर होणारच! एकाचवेळी इस्रोने आकाशात सोडले 9 सॅटेलाईट

Isro Satellite Launch
Isro Satellite Launchesakal

श्रीहरीकोटाः भारतीय आंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज २६ नोव्हेंबर रोजी ९ सॅटेलाईट्स लॉंच केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये भूतानसाठी खास रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट लॉंच करण्यात आलेला आहे.

आज सकाळी ११.५६ वाजता श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरवरील लॉंचपॅडवरुन ओशनसॅट-३ (OceanSat) हा सॅटेलाईट लॉंच करण्यात आला. ही लॉंचिंग पीएसएलव्ही-एक्सएल PSLV-XL या रॉकेटवरुन करण्यात आलेली आहे. यासोबतच भूतानसाठी एक विशेष रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आणि सोबत आठ नॅनो उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

हेही वाचाः मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

भूतानसॅट (BhutanSat aka INS-2B) हा भारत आणि भूतानचा एकत्रित उपग्रह आहे. एका तंत्रज्ञानाशी संबंधित हा सॅटेलाईट आहे. भारताने यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर केली आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग कॅमेरा लागला आहे. त्यामुळे पृष्ठभागाची माहिती मिळवता येईल. रेल्वे ट्रॅक बनवणे, ब्रिज बनवणे यासंबंधी कामं या उपग्रहाद्वारे साध्य होणार आहेत. शिवाय यामध्ये मल्टी स्पेक्ट्रल कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे साध्या फोटोंसह वेगवेगळ्या प्रकाश तरंगांच्या आधारे फोटो निघणार आहेत.

Isro Satellite Launch
Breaking News: 'डीएनए' मॅच झालं, ती हाडं श्रद्धाचीच; आफताबविरुद्ध सर्वात मोठा पुरावा

रॉकेटचं वजन ३२० टन

'ओशनसेट-१' या भारताच्या उपग्रहाला १९९९मध्ये पहिल्यांचा लॉंच केलं होतं. त्यानंतर त्याचा दुसरा सॅटेलाईच २००९मध्ये अंतराळात सोडण्यात आला. मध्ये ओशनसेट-३ लॉंच करण्याऐवजी स्कॅटसॅट-१ लॉंच करण्यात आलं. कारण ओशनसॅट निकामी ठरलं होतं. ओशनसेटच्या माध्यमाधून समुद्री सीमांवर निगराणी ठेवण्यात येते.

आज लॉंच केलेल्या आठ सॅटेलाईट्ना पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेच्या माध्यमातून लॉंच करण्यात आलेलं आहे. हे रॉकेट ३२० टन वजनाचं आहे. त्याची लांबी ४४.४ मीटर तर व्यास २.८ मीटर आहे. या रॉकेटमध्ये चार स्टेज आहेत. त्यामुळे इतर उपग्रहांना वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये लाँच करता येतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com