इस्त्रोकडून RISAT-2B उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

'RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल.

चेन्नई: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (बुधवार) RISAT-2B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

इस्रोच्या पीएसएलव्ही 46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने आज सकाळी श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला. यानंतर 615 किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 555 किमी उंचीवर स्थिर करण्यात आला. पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही 46 वी यशस्वी मोहीम आहे. RISAT मालिकेतील पहिला उपग्रह 20 एप्रिल 2009 मध्ये अवकाशात सोडण्यात आला होता.

'RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल. या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे आहे. RISAT-2B च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रो चंद्रयान-2 मोहीमेवर लक्ष केंद्रित करणार आहे,' असे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: isro PSLV-C46 Risat-2B mission a success