'आयएल अँड एफएस'ची जवानांच्या कल्याण निधीला झळ 

Issue of IL and FS soldiers welfare fund
Issue of IL and FS soldiers welfare fund

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या "आयएल अँड एफएस'मधील गुंतवणुकीची झळ जवानांच्या कल्याणकारी निधीला बसण्याची शक्‍यता आहे. लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी तीन फंड असून, त्यातील बहुतांश निधी "आयएल अँड एफएस'च्या रोख्यांमध्ये गुंतवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र "आयएल अँड एफएस'मधील गैरव्यवहारांमुळे कंपनी संकटात सापडली असून, पेन्शन फंडांपाठोपाठ जवानांचा कल्याणकारी निधी धोक्‍यात आला आहे. 

भारतीय लष्कराच्या आर्मी वेल्फेअर फंड, नॅशनल डिफेन्स फंड आणि जवानांच्या वीरपत्नींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणारा निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा फंड अशा तीन फंडांमध्ये जवानांकडून योगदान दिले जाते. या तीनही फंडांतील निधी वृद्धिंगत होण्यासाठी विविध सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. जवानांसाठीच्या याच तीन फंडांमधून "आयएल अँड एफएस'च्या "एएए' मानांकन असलेल्या रोख्यांमध्ये (बॉंड) काही प्रमाणात गुंतवणूक करण्यात आल्याचा दावा "आयएएनएस' या वृत्तसंस्थेने केला आहे. ही गुंतवणूक धोक्‍यात असून, परतावा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. 

या तीनही फंडांचे जवानांकडून स्वतंत्रपणे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे सरकारकडून देखील यावर तातडीने उपाययोजना होण्याची शक्‍यता कमी असल्याचे मत या वृत्तात व्यक्त करण्यात आले आहे. आर्थिक अनागोंदीने "आयएल अँड एफएस' समूहाची वाताहत झाली आहे. "आयएल अँड एफएस'च्या बॉंडमध्ये गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड कंपन्यांची आणि पेन्शन फंडांची हजारो कोटींची देणी थकली आहेत. "आयएल अँड एफएस'वर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com