आमदार आनंद सिंग यांच्या राजीनाम्याबद्दल संभ्रम - गृहमंत्री एम. बी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

बेळगाव - काँग्रेसचे आमदार आनंद सिंग यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिध्द झाले आहे. मात्र, आमदार सिंग यांनी विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांच्याकडे अद्याप राजीनामा दिलेला नाही. यामुळे त्यांच्या राजीनाम्याबद्दल अद्यापही संभ्रम आहे, अशी माहिती गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. 

युती सरकारमधील नेत्यांमध्ये कुरघोड्या सुरु असून सरकार कधीही कोसळेल, असा दावा केला जात आहे. त्यामध्ये बळ्ळारी जिल्ह्यातील विजयनगर मतदारसंघाचे आमदार आनंद सिंग यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. 1) सकाळी त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री पाटील यांच्याकडे आज (ता. 1) विचारणा केली असता, त्यांनी प्रसारमाध्यमातून सिंग यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. अधिकृतरित्या अद्यापही राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले. 

कोणत्याही आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करण्याची गरज असते. मात्र, आमदार सिंग यांनी अजूनपर्यंत तरी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिलेला नाही. आमदार सिंग यांनीच नव्हे, तर उर्वरित नाराज आमदारांनीही अध्यक्षांकडे राजीनामा दिलेला नाही. केवळ प्रसिध्दीसाठी विरोधकांची स्टंटबाजी सुरु असल्याचा आरोप गृहमंत्री पाटील यांनी केला. भाजपला सरकार स्थापनेसाठी 15 आमदारांची गरज आहे.

एवढ्या संख्येने आमदारांची जुळवाजुळव करणे शक्‍य नाही. त्यामुळे ऑपरेशन कमळ यशस्वी होऊ शकत नाही. पक्षातील काही नाराज आमदारांशी चर्चा सुरु असून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याला नक्कीच यश मिळेल, असा दावाही गृहमंत्र्यांनी केला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Resignation of MLA Anand Singh