सांडपाणी प्रकिया प्रकल्पास हलगा ग्रामस्थांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

बेळगाव - हलगा गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात आज हलगा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर बैठकीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांचा वाढता विरोध पाहून  गावात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.  

या बैठकीत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी मार्गदर्शन केले. श्री. सुंठकर म्हणाले, सर्व ग्रामस्थांनी जमीन वाचविण्यासाठी 10 वर्षे लढा उभारला आहे. तरीही सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. लोकप्रतिनिधी व सरकारने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. या प्रश्नावर जिल्हाधिकारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक बोलविण्यात यावी

सदानंद बिळगोजी यांनी प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याने प्रकल्प हद्दपार करावा अशी मागणी केली तर सदानंद सैबनावर यांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्राम पंचायत सदस्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी  केली.

ग्राम पंचायत सदस्य प्रकाश लोहार यांनी सांडपाणी प्रकल्प बंद करण्यासाठी ग्राम पंचायतीने अनेकदा ठराव मंजूर केला आहे तसेच आजही प्रकल्प बंद करावा अशीच मागणी ग्रामस्थांची आहे. याकडे लक्ष द्यावे,  अशी मागणी केली.

पोलिस अधिकारी नारायण बरमनी यांनी शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करावे तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी लवकर बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Wastewater Process Project in Halga Belgaum