esakal | ITR भरण्याची मुदत वाढली; जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

ITR

ITR भरण्याची मुदत वाढली; जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
सुधीर काकडे

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टेक्सेशनने (CBDT) वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. कोरोना (Covid-19) महामारीची दुसरी लाट पाहता ITR भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2021 पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत आधीच वाढवण्यात आली होती. इन्फोसिसद्वारे विकसित केलेल्या नवीन इन्कम टॅक्स पोर्टलवर सतत येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे, या समस्यांवरून सरकारकडून देखील त्यांना आता विरोध सहन करावा लागत आहे.

आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आणि इतर भागधारकांनी नोंदवलेल्या अडचणी आणि आयटीएक्ट, 1961 अंतर्गत मुल्यांकन वर्ष 2021-22 साठी विविध लेखापरीक्षण अहवाल लक्षात घेऊन, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टेक्सेशनने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला, अशी सीबीडीटीने एका परिपत्रकाद्वारे दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांच्यासोबत बैठक घेऊन ई-फाइलिंग पोर्टलमधील समस्यांबद्दल सरकार तसेच करदात्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा: ऑगस्ट महिन्यात १९ लाख भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या - CMIE

दरम्यान, या प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी सोडवल्या जात असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये 15.55 लाखांपेक्षा अधिक सरासरीसह 8.83 कोटीहून अधिक करदात्यांनी मंगळवारपर्यंत लॉग इन केले आहे. "सप्टेंबर 2021 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे दररोज 3.2 लाखाने वाढले असून AY 2021-22 साठी 1.19 कोटी ITR दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 76.2 लाख करदात्यांनी पोर्टलच्या ऑनलाईन युटिलिटीचा वापर रिटर्न भरण्यासाठी केला आहे अशी माहिती या निवेदनात दिली आहे.

loading image
go to top