'जो पक्षाचा झाला नाही तो देशाचा काय होणार?'

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने राज्यसभेवर आणलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘जो पक्षाचा झाला नाही, तो देशाचा काय होणार?‘ अशी टीका केंद्रीय मंत्री हसिमरत कौर बादल यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कौर म्हणाल्या, "ज्या पक्षाने त्यांना तीन वेळा खासदार केले ते त्या पक्षाचे झाले नाहीत. मग ते देशाचे काय होणार?‘ असा प्रश्‍न उपस्थित त्यांनी "पंजाबच्या जनतेने त्यांना योग्य उत्तर द्यावे‘ असे आवाहन केले. यावेळी आम आदमी पक्षावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, ""आम आदमी पक्षाला कोणतीही विचारसरणी नाही. अलिकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सिद्धू यांना नकलाकार म्हटले होते.‘ तसेच आता त्यांना केजरीवाल का आवडले हे कळत नसल्याचेही कौर पुढे म्हणाल्या.

नवज्योतसिंग सिद्धू अद्याप भाजपमध्येच?
नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू अद्यापही भारतीय जनता पक्षामध्येच असल्याच्या प्रतिक्रिया पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विजय संपला यांनी म्हटले आहे.

Web Title: "It's not going to happen that the land was the party? '

टॅग्स