Video: 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस...

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

कोलकता शहरामध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडला. नोटा गोळा करताना अनेकांची दमछाक झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

कोलकाता : कोलकता शहरामध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडला. नोटा गोळा करताना अनेकांची दमछाक झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

कोलकाता शहरातील बेंटींक स्ट्रीटवर होक मर्कंटाईल प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या इमारतीवर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. 20) दुपारी तीनच्या सुमारास छापा टाकला. छापा पडल्याचे कळताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इमारतीची सहाव्या मजल्यावरील काच फोडून नोटांच्या बंडलांच्या थप्प्या खाली फेकायला सुरूवात केली. इमारीमधून नोटांचा पाऊस पडायला लागल्यानंतर  सुरक्षारक्षक आणि उपस्थितांनी गोळा करायला सुरूवात केली. नोटा गोळा करताना दमछाक होऊ लागली. संबंधित व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नोटांचा पाऊस पडत असाना एका दुकानदाराने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.

दरम्यान, केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा आणल्या. त्यावेळी 500 व 1000 रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या जातात आणि त्यातून काळ्या पैशाचा उगम होतो, असे सांगितले होते. पण, अशा छाप्यांमध्ये मोठ्या मूल्याच्या नोटा आढळून येत नसल्याने आणि चलनातही त्यांचा वापर कमी होत आहे. नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झालेली असली तरीही काळा पैसा नष्ट करण्याचा मूळ उद्देश सफल झालेला दिसत नाही. आयकर विभाग, महसूल विभाग छापेमारी करत असून, अशा छाप्यांमध्ये करोडोंची संपत्ती उघड होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Its raining Rs 2000 and Rs 500 notes on kolkata street