esakal | जे.पी. नड्डा भाजपचे नवे अध्यक्ष; जाणून घ्या नड्डांविषयी!
sakal

बोलून बातमी शोधा

j p nadda elected as bjp president unopposed information in marathi

भाजप अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांचीच निवड होणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली.

जे.पी. नड्डा भाजपचे नवे अध्यक्ष; जाणून घ्या नड्डांविषयी!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली New Delhi  : भारतीय जनता पक्षाच्या BJP राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा (J P Nadda) यांची बिनविरोध निवड झालीय. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. पक्षाचे मावळते अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नड्डा यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजप अध्यक्षपदी नड्डा यांचीच निवड होणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गृहखात्याची सूत्रे देण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदी अमित शहा यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. त्याचवेळी नड्डा यांची काही काळासाठी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळं पक्षाच्या अध्यक्षपदी नड्डा यांचीच नियुक्ती होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानुसार आज, नड्डा यांची पक्षाच्या बैठकीत बिनविरोध निवड झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना पक्षाध्यक्षपदाची सूत्रे दिली.

आणखी वाचा - भाजप नेत्याला थप्पड मारणाऱ्या प्रिया वर्मा 21 व्या वर्षी होत्या डीएसपी

कोण आहेत नड्डा
जे. पी. नड्डा यांचे नाव जगत प्रकाश नड्डा असे आहे. त्यांचा जन्म बिहारमध्ये पाटणा येथे झाला असून, त्यांचे शालेय आणि कॉलेजचे शिक्षण पाटणा शहरातच झाले. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी हिमाचलप्रदेश विद्यापीठात शिमला येथे प्रवेश मिळवला. तेथे त्यांनी एएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हिमाचल प्रदेशातूनच सुरुवात झाली. 1993च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले. त्यानंतर 1998मध्ये पुन्हा ते निवडून आले. 20007मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती. पण, 2012मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशमधूनच राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. 2014मध्ये भाजपचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं. त्यानंतर मंत्रिमंडळ बदलात डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून आरोग्य खात्याची जबाबदारी नड्डा यांच्याकडे देण्यात आली. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यामुळेच त्यांच्यावर आता पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

loading image