भाजप नेत्याला थप्पड मारणाऱ्या प्रिया वर्मा 21व्या वर्षी होत्या डीएसपी!

टीम ई-सकाळ
सोमवार, 20 जानेवारी 2020

प्रिया यांनी 2017मध्ये पुन्हा मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात त्या चौथ्या क्रमांकानं पास झाल्या.

भोपाळ : आज, सकाळपासून प्रिया वर्मा या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहेत. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी असलेल्या प्रिया वर्मा यांनी भाजपचे आंदोलन सुरू असताना एका नेत्याला जोरदार थप्पड मारली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर #प्रियावर्माजिंदाबाद असा ट्विटर ट्रेंडही सुरू झाला. त्यामुळं या प्रिया वर्मा आहेत तरी कोण? अशी उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - भाजप नेत्याला थप्पड, उपजिल्हाधिकारी आल्या ट्रेंडमध्ये

अवघ्या 21व्या वर्षी बनल्या जेलर
प्रिया वर्मा या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. मध्य प्रदेशातील इंदौरजवळच्या मंगलिया या गावात प्रिया वर्मा यांचे कुटुंब राहते. महेश आणि किरण यांच्या प्रिया या धाकट्या कन्या आहेत. प्रिया यांनी 2014 मध्ये, मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या 21व्या वर्षी पास केली होती. प्रशिक्षणानंतर त्यांना कारागृह अधिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं होतं. उज्जैन जवळच्या भैरवगड कारागृहात त्यांनी अधिक्षक म्हणून काम केले होते. सहा महिने त्यांनी तेथे काम केले. त्यानंतर 2015मध्ये त्यांची पोलिस उपधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. 2016मध्ये त्यांनी पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पण, त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये होते. त्यांचा स्पर्धा परीक्षा देण्याचा सिलसिला काही थांबला नाही.

आणखी वाचा - पोलिस करतायत 'सायवॉर'शी दोन हात 

आता आयएएसची तयारी
प्रिया यांनी 2017मध्ये पुन्हा मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात त्या चौथ्या क्रमांकानं पास झाल्या. सध्या त्यांची राजगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. भाजप नेत्याला थप्पड मारल्यानं त्या चर्चेत आल्या असल्या तरी, उपजिल्हाधिकारी होऊन त्या थांबलेल्या नाहीत. सध्या त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असून, त्यांना आयएएस व्हायचं आहे. सुटीच्या काळात महात्मा गांधी इन्स्टिट्यूट या संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करत असतात. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सेल्फ स्टडी हाच एक उत्तम पर्याय आहे. विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना, खूप वाचन करतात आणि भटकतात. मुळात परीक्षेत काय विचारलं जातं. त्याचीच फक्त तयारी करावी आणि मुलाखतीमध्ये तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. याची तयारी करावी. 
- प्रिया वर्मा, उपजिल्हाधिकारी, राजगड, मध्य प्रदेश (Source : TalentedIndia Youtube)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra bjp leaders to meet governor after meeting at varsha bungalowdeputy collector priya verma was jailer at 21 success story in marathi