Rahul Gandhi: प्रियांका गांधींच्या सभेत दाढीवाल्या राहुल गांधींना खाल्ला भाव

प्रियंकाच्या सभेला ड्युप्लीकेट राहुल गांधींची एंट्री
Rahul Gandhi
Rahul GandhiEsakal

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जबलपूरमधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला काल सुरुवात केली आहे. एकीकडे प्रियंका गांधींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी या प्रचारसभेत डमी राहुल गांधींना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. भोपाळचे रहिवासी राकेश कुशवाह यांना पाहून लोक त्यांना राहुल गांधी समजत होते.(Latest Marathi News)

राकेश यांचा चेहरा, केस आणि दाढी हुबेहूब राहुल गांधींसारखी आहे आणि लोकांमध्ये ते राहुल गांधींसारखे दिसणारे म्हणून ओळखले जातात. त्याला कार्यक्रमात पाहिल्यानंतर लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक झाले. जेव्हा राकेश यांना राहुल गांधींसारखी दाढी आणि केस असण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ते राहुल गांधींचे चाहते आहेत आणि लोक अनेकदा त्यांना राहुल गांधी समजतात.(Marathi Tajya Batmya)

Rahul Gandhi
Child Marriage : धक्कादायक! आईवडिलांनीच केला पोटच्या लेकीचा चार वर्षात तीन वेळा बालविवाह

जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू झाली, तेव्हापासूनच त्यांनी राहुल गांधींप्रमाणे दाढी वाढवण्यास सुरुवात केली आणि आता त्यांना पाहून लोक हैराण झाले. अनेकवेळा लोक वाटेत थांबून त्याच्यासोबत सेल्फी घेतात. राकेश सांगतात की, राहुल गांधींसारखे दिसण्याचा मला अभिमान वाटतो.(Latest Marathi News)

दरम्यान प्रियांका गांधी यांनी जबलपूर येथील भाषणात शिवराज सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदीजींनी जी गैरव्यवहारांची यादी काढली, भाजपच्या घोटाळ्यांची यादी त्यापेक्षा मोठी आहे. त्यांनी नर्मदा मैयालाही सोडले नाही. बांधकामात घोटाळा केला. त्यांनी 225 महिन्यांत 220 घोटाळे केले आहेत असंही त्या म्हणाल्या आहेत.(Marathi Tajya Batmya)

Rahul Gandhi
Crime News: रिक्षात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरडाओरडा करताच रिक्षातून बाहेर फेकलं अन्...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com