Child Marriage : धक्कादायक! आईवडिलांनीच केला पोटच्या लेकीचा चार वर्षात तीन वेळा बालविवाह

बीड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा तीन वर्षांत तीनवेळा बालविवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
Child Marriage
Child Marriage Esakal

बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा तीन वर्षांत तीनवेळा बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पालकांसह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील बावी येथील एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह शिरुर कासार तालुक्यातील उकांडा चकला येथील तरुणासोबत झाला. अल्पवयीन विवाहिता दोन महिने त्या घरी राहिली. काही दिवसात मतभेद झाल्यामुळे नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटविला आणि त्यानंतर ही मुलगी बावी येथे आपल्या आई-वडिलांकडे राहत होती.(Marathi Tajya Batmya)

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ३८ वर्षीय तरुणाशी तिचा दुसरा विवाह करण्यात आला. तिथेही पतीसोबत न पटल्यामुळे आणि तिचा छळ होऊ लागल्यामुळे पुन्हा ती पुन्हा माहेरी निघून आली. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी नात्यातीलच एका तरुणासोबत ७ जून २०२३ रोजी कोणालाही न सांगता गुपचूप तिचा तिसरा विवाह लावून दिला. तेव्हा तिचे वय १७ वर्षे असल्याचे बाल संरक्षण समितीसमोर आले.(Latest Marathi News)

Child Marriage
Eknath Shinde: शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? मुख्यमंत्र्यांनी रात्री घेतली तातडीची बैठक

अल्पवयीन मुलीचा तिसऱ्यांदा बालविवाह झाल्याची माहिती तालुका बाल संरक्षण समिती व चाइल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावरून मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी महादेव जायभाये, सहपोलीस निरीक्षक गणेश धोकट्र, तहसीलदार शिवनाथ खेडकर, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तालुका बाल संरक्षण समिती सदस्य समीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बावीचे ग्रामसेवक सिद्धार्थ खेमाडे, सरपंच, अंगणवाडी सेविका यांनी मुलीच्या गावी बावी येथे चौकशी केली असता मुलगी आणि तिचे कुटुंबीय सापडले नाहीत.(Latest Marathi News)

Child Marriage
मोठा निर्णय! प्रश्नपत्रिका वाचायला मिळणारे १० मिनिटे आता बंद; पेपर सुरु झाल्यावरच मिळणार प्रश्नपत्रिका

याच पथकाने दहीवंडी येथील कठाळे वस्तीवर जाऊन या प्रकरणाची चौकशी केली असता त्या वेळी या अल्पवयीन मुलीचे लग्न न करता साखरपुडा झाल्याचे सांगण्यात आले. परंतु पथक आल्यामुळे नातेवाइकांनी अल्पवयीन मुलीला आणि नवरदेवाला लपवून ठेवले होते.(Marathi Tajya Batmya)

मात्र पोलिसांनी विचारताच सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांसह लग्न जमावणारे, फोटोग्राफर, आचारी आणि लग्नासाठी आलेल्या २५ ते ३० जणांविरुद्ध ग्रामसेविका सीमा खेडकर यांच्या तक्रारीवरून बालविवाह प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीला बाल कल्याण समितीने सुधारगृहात पाठवले आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत तिच्या पालकांसह 30 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Child Marriage
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ 48 तासांत भारतात धडकणार! गुजरात ऑरेंज अलर्ट मोडवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com