राजकीय संघर्ष टोकाला; आता माजी मुख्यमंत्र्यांच्या राहत्या घरावर डोळा?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

नायडू यांच्या निवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला आणि आता त्यांना त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावल्याने चंद्रबाबू नायडू यांची डोकेदुखी वाढली आहे.

नवी दिल्ली - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सत्तेत असताना नायडू यांनी बनविलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी बुडलडोजर फिरवले. त्यानंतर नायडू यांच्या निवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला आणि आता त्यांना त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावल्याने चंद्रबाबू नायडू यांची डोकेदुखी वाढली आहे.

कृष्णा नदीकाठी घरांची विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे ह्या नोटीस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सात दिवसाच्या आत नोटीसला उत्तर दिले नाहीतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा विकास प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेशात सत्तांतर होताचं सूडाच्या राजकारणाला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी बांधलेल्या निवासस्थानावर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी थेट बुलडोझर फिरवला होता. चंद्राबाबू सुट्टीसाठी बाहेर गेले असताना ही कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jagan Mohan Reddys Curfew on the residence of Chandrababu Naidu