Jagnnath Rath Yatra 2022: आजपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरूवात, भक्त पाहोचले जगन्नाथपुरी

यावर्षी भक्तांची गर्दी या रथयात्रेत बघायला मिळणार आहे.
Jagannath Rath Yatra 2022
Jagannath Rath Yatra 2022esakal

जगन्नाथ यात्रेला आजपासून सुरूवात झाली असून येत्या १२ जुलैपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी ही यात्रा असणार आहे. भक्तांकडून यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे.श्री जगन्नाथ आणि त्यांचे भावंड बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथाची दोरी खेचत नेत भक्त या रथांना जगन्नाथांच्या मावशीच्या घरी म्हणजेच गुंडीचा मंदिरात घेऊन जाणार आहेत.मागल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावाने भक्तांना एकत्र जमता आले नव्हते.त्यामुळे यावर्षी भक्तांची गर्दी या रथयात्रेत बघायला मिळणार आहे. (Jagnnath Rath Yatra 2022)

पूजेसाठी सकाळपासूनच भक्ता पोहोचण्यास सुरूवात झाली आहे.पूजेनंतर जगन्नाथांचा जयजयकार करत भक्तांच्या आवाजाने संपूर्ण क्षेत्र प्रसन्न झाले आहे.पूजेनंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केल्या गेले.या रथयात्रेसाठी संपूर्ण रस्ते पाण्याने झाडून स्वच्छ केल्या गेले आहेत.

यावर्षी भक्तांना रथयात्रेची परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे भावूक आणि श्रद्धाळू भक्त मोठ्या संख्येने पुरीच्या जगन्नाथांच्या दर्शनासाठी एकत्र जमले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com