
Summary
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या ठावठिकाणाबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
कपिल सिब्बल यांनी अमित शाह यांना सोशल मीडियावर प्रश्न विचारला – धनखड रुग्णालयात आहेत की योग/टेबल टेनिस खेळत आहेत?
सरकारी बाजूने स्पष्टीकरण – धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असून ते योगाभ्यास व टेबल टेनिससारख्या क्रियांमध्ये व्यस्त आहेत.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने काँग्रेससह विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. धनखड रुग्णालयात दाखल आहेत की योग करत आहेत हे तरी सांगा असा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर शाहांना विचारला आहे.