

Jaipur Accident News
ESakal
सोमवारी (३ नोव्हेंबर) राजस्थानमध्ये आणखी एका मोठ्या रस्ते अपघाताने लोकांना धक्का बसला. जयपूरच्या हरमन भागात एका अनियंत्रित डंपर ट्रकने ३० हून अधिक वाहनांना धडक दिली. डंपरचे ट्रॅक ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. ज्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.