जयपूर : राजस्थानच्या जयपूर शहरातील (Jaipur Couple Case) मुहाना परिसरातील दादू दयाल नगरमध्ये एका विवाहित दाम्पत्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तींची नावे धर्मेंद्र चौधरी (वय 35) आणि सुमन चौधरी (वय 30) अशी असून, दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.