लष्करे तैयबाच्या आठ दहशतवाद्यांना जन्मठेप

वृत्तसंस्था
बुधवार, 6 डिसेंबर 2017

जयपूर: जयपूरच्या न्यायालयाने आज लष्करे तैयबाच्या आठ दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आठ जणांत तीन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.

न्यायालयाने या सर्वांना दोन लाख रुपयांचा दडंही ठोठावला आहे. देशात दहशतवादी कृत्यांत सहभागी झाल्याच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या आठ जणांना तीस नोव्हेंबरलाच दोषी ठरविले होते. आज या सर्वांना शिक्षा सुनावण्यात आली. राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने या सर्वांना 2010 व 2011 मध्ये अटक केली होती. दहशतवादी कट रचणे, त्याचप्रमाणे अशा कृत्यांसाठी अन्य लोकांना सहभागी करून घेणे या आरोपांवरून त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली.

असगर अली, शकर उला, शाहीद इक्‍बाल अशी शिक्षा झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे आहेत. अन्य पाच जणांची नावे अशी ः बाबू उर्फ निसाचंद अली, हाफिज अब्दुल, अरुण जैन, पवन पुरी, काबील.

हे सर्व जण पाकिस्तानातील लष्करे तैयबाच्या म्होरक्‍याशी सतत संपर्कात होते. 2010 मध्ये त्याच्याशी झालेले संभाषण केंद्रीय गुप्तचर संस्थांनी पकडले होते. त्यानुसार त्यांनी दिलेल्या माहितीनंतर राजस्थान एटीएसने ही कारवाई केली होती.

Web Title: jaipur news Lashkar-e-Taiba terrorists have given life imprisonment