Bharat Jodo Yatra : सावरकरांचा विषय संपला : जयराम रमेश

‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधी यांनी सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केली होती
Bharat Jodo Yatra : सावरकरांचा विषय संपला : जयराम रमेश

बुऱ्हाणपूर : ‘भारत जोडो’ यात्रेच्या महाराष्ट्राच्या टप्प्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. भाजप, मनसेने गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज स्पष्ट केले. महाराष्ट्रानंतर ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशात पोचली असून बुऱ्हाणपूरमध्ये रमेश यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज सकाळी महाराष्ट्रातून बुऱ्हाणपूरमधील बोडार्ली गावात ‘भारत जोडो’ यात्रेने प्रवेश केला.

‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधी यांनी सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी ब्रिटिशांकडे दयेचा अर्जही केला होता, असे वक्तव्य केले होते. सावरकर हे भाजप व आरएसएसचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावरून भाजप, मनसे व इतर राजकीय पक्षांनीही राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले होते. काँग्रेसचे सरचिटणीस व माध्यम प्रभारी जयराम रमेश आज यासंदर्भात बोलताना म्हणाले, की सावरकरांचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. ज्या दिवशी भाजप, आरएसएसचे लोक आमच्याविरुद्ध खोटे बोलायचे थांबवतील, त्यादिवशी आम्ही त्यांच्या नेत्यांविषयी खरे बोलायचे थांबवू, याचा पुनरुच्चारही रमेश यांनी केला.

दररोज २१ कि.मी. प्रवास

‘भारत जोडो’ यात्रा आतापर्यंत सहा राज्यांमधून गेली असून यात्रेत राहुल गांधी इतर सहभागींबरोबर दररोज २१ कि.मी. चालत आहेत, अशी माहितीही रमेश यांनी दिली. त्याचप्रमाणे, यात्रा महाराष्ट्रात असताना काही दिवशी ते दररोज २४ कि.मी. अंतर चालले. जंगलाचा परिसर बसमधून ओलांडण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. ही यात्रा तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून सात सप्टेंबरला सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com