
Burning passenger bus in Rajasthan’s Jaisalmer where a tragic fire claimed 15 lives — rescue teams on-site managing emergency relief.
esakal
Jaisalmer Bus Fire incident: राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात आज(मंगळवार) दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. जैसलमेर येथून जौधपूरला निघालेल्या आणि प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका खासगी बसला अचानक आग लागली. ही घटना इतकी भीषण होती की, काही मिनिटातच संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांमध्ये वेढल्या गेली. या दुर्घटनेत तीन मुलं, चार महिलांसह एकूण १५ प्रवाशांचा जळाल्याने मृत्यू झाला.
ही दुर्घटना घडली तेव्हा बसमध्ये एकूण ५७ प्रवासी होते. बसने पेट घेतल्याने घटनास्थळी प्रचंड धावपळ उडाली, प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर व्यापून गेला. अशावेळी स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेत शक्य होईल तेवढ्यांचा जीव वाचवला.
प्राप्त माहितीनुसार, ही दुर्घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता जैसलमेर येथून जवळपास २० किलोमीटर दूर थईयात गावाजवळ घडली. खरंतर ही बस नेहमीप्रमाणे दुपारी जवळपास ३ वाजता जैसलमेर येथून जोधपूरसाठी रवाना झाली होती. यानंतर अचानक बसच्या मागील भागातून धूर येताना दिसला. बसचालकाला काही लक्षात येण्याआधीच एकदम आग भडकली, त्यानंतर ही आग बसभोवती इतक्या वेगात पसरली की बसमधील प्रवाशांना बसच्या बाहेर पडणंही अशक्य झालं.
बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक धूर येऊ लागल्याने सर्वच प्रवासी घाबरले होते. काहींनी प्रसंगावधान राखत बसच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या, तर काहीजण आगीच्या तावडीत सापडले. यानंतर स्थानिकांनी बसकडे धाव घेत शक्य होईल तेवढ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अग्निशामक विभाग व पोलिसांनाही याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच तीन रूग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहचल्या आणि त्यानंतर प्रवाशांना तातडीने जैसलमेरच्या जवाहीर रूग्णालयात नेलं गेलं. तर या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर गंभीररित्या जखमी प्रवाशांना जोधपूर येथील रूग्णालयात नेण्यात आलं. सध्या सर्व जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.