

नवी दिल्लीः जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघटनेकडून आता महिलांनाही जिहादसाठी तयार केले जाणार आहे. संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याची २१ मिनिटांची एक ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आली आहे. या भाषणामध्ये अझहरने महिलांसाठीच्या नवीन विंग 'जमात-उल-मोमिनात'ची संपूर्ण योजना सांगितली आहे.