जैश-ए-मोहम्मद पुन्हा मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

file photo
file photo

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुन्हा मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारी आहे, असा इशारा गु्प्तचर यंत्रणांनी दिला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 16 ते 17 फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झाले असून, त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलाला अजून मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी आणखी एका आत्मघाती हल्ल्याची योजना आखली आहे. संभाषणावरुन जम्मू किंवा जम्मू-काश्मीरच्या बाहेर हा हल्ला केला जाऊ शकतो, असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दर्शवला आहे.'

'पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्फोट घडवूण आणणारा अली अहमद दार याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. जैश-ए-मोहम्मद पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तयारीचा व्हिडीओ प्रसिद्ध करणार आहे. या व्हिडीओचा आधार घेत जैश-ए-मोहम्मद ही संघटना काश्मीरमधील तरुणांना संघटनेत सामील करुन घेत आत्मघाती हल्ल्यांसाठी वापर करण्याची शक्यता आहे. दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी 21 जण तयार आहेत,' अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, दहशतवाद्यांमधील संभाषण हे जाणुनबुजून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला असून, सर्व काळजी घेत आहोत, असेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com