
जयशंकर यांनी पुन्हा एकदा युक्रेनवर युरोपीय देशांना सुनावले; म्हणाले...
आम्हाला पण रशिया आणि युक्रेनचा संघर्ष तात्काळ संपवायचा आहे. मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संवादाचा आग्रह धरत आहोत. आम्ही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या गरजेवरही भर देतो, असे म्हणत भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (Subramaniam Jaishankar) यांनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेनच्या मुद्द्यावरून युरोपीय देशांना सुनावले. परराष्ट्र मंत्रालयाच्या रायसीना संवाद कार्यक्रमात त्यांनी युक्रेन संघर्षात भारताची भूमिका स्पष्ट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. (Jaishankar told European countries)
रशिया (russia ) आपल्या संपर्कात आहे. त्यापेक्षा जास्त युरोपमधील देशांशी संपर्कात आहे. लोकशाहीचा विचार केला तर गेल्या वर्षी अफगाणिस्तानात जे काही घडले ते सर्व लोकशाहीवादी देश पाहत होते. इंडो-पॅसिफिक प्रदेशात आमच्यासमोर असलेल्या आव्हानांवर कोणताही लोकशाही देश कुठे कृती करतो, असे नॉर्वेचे परराष्ट्रमंत्री अनिकेन हुइटफेल्ड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर (Subramaniam Jaishankar) म्हणाले.
हेही वाचा: चिमुकलीने चुकून घेतला व्हिस्कीचा घोट; आजीने पाजली अर्धी बॉटल अन्...
जेव्हा आशियामध्ये नियम-आधारित प्रणालीला आव्हान दिले जात होते तेव्हा आम्हाला युरोपमधून अधिक व्यवसाय करण्याचा सल्ला मिळाला. निदान आम्ही तुम्हाला तो सल्ला देत नाही आहोत. मुत्सद्देगिरी आणि संवादाकडे परत जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे. अफगाणिस्तानकडे पहा आणि कृपया मला सांगा की जगातील देशांनी कोणती न्याय्य नियमावर आधारित प्रणाली स्वीकारली आहे, असेही जयशंकर (Subramaniam Jaishankar) म्हणाले.
चीन, पाकिस्तानलाही गुंडाळले
आशियातील असे काही भाग आहेत जिथे सीमारेषा निर्धारित केलेल्या नाहीत. देशाद्वारे दहशतवाद प्रायोजित केला जातो. आशियातील नियमांवर आधारित व्यवस्था एका दशकाहून अधिक काळ तणावाखाली आहे हे जगाने समजून घेणे महत्त्वाचे आहे, असेही जयशंकर चीन (China) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) संदर्भात म्हणाले.
Web Title: Jaishankar Told European Countries Russia Ukraine War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..