जेटलींचे मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी 

पीटीआय
मंगळवार, 15 मे 2018

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरील मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरील मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

एम्सच्या माध्यमे तसेच शिष्टाचार विभागाच्या प्रमुख आरती विज यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की जेटली यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. जेटली आणि त्यांना मूत्रपिंड दान करणारे, या दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यामध्ये सुधारणा होत आहे. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त जेटली मागील एक महिन्यापासून डायलिसिसवर होते. काही वर्षांपूर्वी जेटलींच्या हृदयाचीही शस्त्रक्रिया झाली आहे. 

Web Title: Jaitley's kidney transplant is successful