शाही इमाम ब्लॅकमेलर; अबू आझमी यांचा आरोप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जामा मशीदचे इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मुस्लिम समाजाला समाजवादी पक्षावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुखारींवर टीका करत ते ब्लॅकमेलर असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना आझमी म्हणाले, "शाही इमाम आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. ते ब्लॅकमेलर आहेत. पद मिळविण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी वाटाघाटी करणाऱ्यांपैकी ते एक आहेत. मुलायमसिंह त्यांना खूप सन्मान देतात. त्यांच्या जावायला त्यांनी उमेदवारीचे तिकिट दिले आहे. समाजवादी पक्षाला अशा इमामांची गरज नाही. आम्ही जनतेच्या बळावर काम करत आहोत आणि भविष्यातही असेच काम करत राहणार आहोत.'

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने समाजावादी पक्षावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन बुखारी यांनी बुधवारी केले होते. त्यांनी बहुजन समाजवादी पक्षाला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले.

Web Title: Jama Masjid Shahi Imam is blackmailer - Abu Azami