लुधियाना स्फोटाचं खलिस्तानी कनेक्शन; पंजाबच्या DGPची माहिती

ड्रग्ज संबंधींचे गुन्हे आणि दहशतवाद या दोन्हींचं कॉकटेल धोकादायक
Ludhiana Court Blast
Ludhiana Court Blast

लुधियाना : देशाला हादरवून टाकणाऱ्या लुधियाना कोर्ट परिसरातील बॉम्बस्फोटामागे (Ludhiana court complex blast) खलिस्तानी कनेक्शन (Khalistani Connection) असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे, पंजाबचे पोलीस महासंचालक (Punjab DGP) सिद्धार्थ चट्टोपाध्याय (Siddharth Chattopadhyay) यांनी ही माहिती दिली. लुधियानातील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात २३ डिसेंबर रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले होते. (Ludhiana court blast Found Khalistani drug smugglers links says Punjab DGP)

Ludhiana Court Blast
Omicron Updates : देशातील ओमिक्रोन रूग्णांची संख्या 400 पार

माध्यमांसमोर माहिती देताना डीजीपी चट्टोपाध्याय म्हणाले, "आम्हाला या बॉम्बस्फोट प्रकरणात खलिस्तानी घटक, गॅंगस्टर्स आणि ड्रग्ज स्मगलर्स यांचं कनेक्शन असल्याचं आढळून आलं आहे. दहशतवाद आणि नार्कोटिक्सचं आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. ड्रग्ज संबंधींचे गुन्हे आणि दहशतवाद या दोन्हींचं कॉकटेल हे धोकादायक आहे. लुधियाना बॉम्बस्फोट प्रकरण हे याच प्रकारचं आहे. या प्रकरणाचा चोवीस तासात छडा लावण्यात आला. घटनास्थळावरुन यासाठी आपल्याला अनेक लीड्स मिळाले. या ठिकाणी काही फाटलेले कपडे, सिमकार्ड, मोबाईल आणि एकाच्या हातावर टॅट्यू आढळून आले आहेत"

असा घडला स्फोट

लुधियाना कोर्टात स्फोट कसा झाला याची माहिती देताना डीजीपी म्हणाले, मृत्यू पावलेली व्यक्ती स्फोटकं घेऊन चालली होती. पण चोवीस तासातच आपण मुख्य आरोपीला शोधून काढलं. आरोपाला यापूर्वी सन २०१७ मध्ये अटक झाली होती. बब्बल खालसा, पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या प्रो-खलिस्तान संघटनांचा या स्फोटामागे हात असल्याचा संशय आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान, पोलीस आणि राष्ट्रीय तपास पथक (एनएसजी) यांना विश्वास आहे की, मृत्यू झालेल्या व्यक्तीनंच कोर्टाच्या परिसरात बॉम्ब ठेवला. ही व्यक्ती म्हणजे पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला एक पोलीसच आहे, ज्याचं नाव गगनदीप आहे.

Ludhiana Court Blast
...तर आम्ही पुन्हा कृषी कायदे लागू करू; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत

सुत्रांच्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटावेळी गगनदीपच्या मोबाईलचा स्फोट झाला. यावेळी त्याच्याजवळ डोंगल होतं ज्याद्वारे तो इंटरनेट वापरत होता. एनआयए आणि पंजाब पोलिसांना संशय आहे की, त्याला बॉम्ब तयार आणि अॅक्टिवेट कसा करायचा याची कोणीतरी ऑनलाइन सूचना देत होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com